Ahilyanagar crime :महिलांना चाकुचा धाक दाखवून लुटणारे आरोपी जेरबंद, वाचा कुठला आहे प्रकार?


विक्रम बनकर, अहिल्यानगर: जिल्ह्यातील पाथर्डी व नेवासा भागात महिलांना चाकुचा धाक दाखवून लुटणारे आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीकडून ३ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच गुन्हयांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी एक च्या सुमारास फिर्यादी संतोष भगवान खेडकर (वय ४२, रा.मालेवाडी, ता.पाथर्डी) यांचे राहते घरी त्यांच्या आजी घरामध्ये बसलेल्या असताना अज्ञातांनी घरात येऊन, धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादीचे आजीच्या नाकातील सोन्याची नथ ओरबडून चोरून नेली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यातजबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी सदर गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्हयातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार सुरेश माळी, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रविंद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भगवान थोरात, किशोर शिरसाठ, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, महादेव भांड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सूचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी पथक पाथर्डी पोलीस स्टेशन येथे तपास करीत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा सचिन ईश्वर भोसले (रा.बेलगाव, ता.कर्जत) याने त्याचे भावासह केला असून ते त्यांचे राहते घरी बेलगाव, ता.कर्जत येथे येणार आहे. त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीवरून बेलगाव (ता.कर्जत) येथे आरोपींच्या घरी शोध घेऊन मुख्य आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपींना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सचिन ईश्वर भोसले( वय २५, रा.बेलगाव, ता.कर्जत जि.अहिल्यानगर)असे असल्याचे सांगितले. आरोपीकडून पंचासमक्ष एकुण ३ लाख ५० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागीने वेगवेगळे दागिने व एक चाकू असा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे.  

पथकाने आरोपीला  विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाथर्डी तालुक्यात सांगवी, करोडी व मालेवाडी येथे गुन्हा केल्याची माहिती दिली आहे. तसेच आरोपीनेआणखी कोठे गुन्हे आहेत काय, याबाबत विचारपूस केली असता त्याने  पैऱ्या उर्फ पैरेदार उमरका भोसले (फरार), गाडया उर्फ गाडेकर झारक्या चव्हाण (फरार) (दोन्ही रा.नवी नागझरी, ता.गेवराई, जि.बीड) यांच्यासोबत मिळून सौंदाळा, हांडीनिमगाव, ता.नेवासा येथे टीव्हीएस रायडर मोटार सायकलवर जाऊन चोरी केली असलेबाबतची माहिती दिली.

ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदरची कारवाईपोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

पहा व्हिडीओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने