विक्रम बनकर, अहिल्यानगर : ‘ ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे, जग दिसणारच तसं, आपण कशाला काय बोलायचं,’ असे प्रत्युत्तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना दिले आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नगरसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ‘अण्णा हजारेंना महात्मा करण्याचं काम केजरीवाल, सिसोदिया यांनी केलं. नाहीतर त्यांनी कधी दिल्ली पाहिली असती? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहित झाले, नाहीतर ते राळेगणचे दैवत होते. केजरीवाल आणि सिसोदियांनी भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईला तोंड फोंडलं, अण्णा हजार त्याचे प्रतिक होते. त्यानंतर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचं सरकार असेल त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही हे दुर्देर्वाने सांगायला लागत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला अवघ्या एका वाक्यात अण्णा हजारे यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे आता यावर राऊत नेमकी काय प्रक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा