Anna Hazare : मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले असतील तर राजीनामा द्या, अण्णा हजारेंचा रोख नेमका कोणाकडे?


विक्रम बनकर, अहिल्यानगर : 'मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले असतील, तर त्यांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा. त्यामुळे त्यांची प्रतिमा अधिक स्वच्छ राहते आणि जनतेत योग्य संदेश जातो,' असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे अण्णा हजारेंचा रोख नेमका कोणाकडे आहे? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वाचा : कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या 5 व्यावसायिकांवर छापे

'मंत्र्यांचे आचार-विचार शुद्ध हवेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप झाला की पहिल्यांदा जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे,' असे सांगतानाच अण्णा हजारे पुढे म्हणाले,'लोकांना मंत्रिमंडळात घेण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार? देश कुठे जाणार आहे. मंत्रिमंडळात असताना आरोप झाल्यावर एक क्षणसुद्धा पदावर राहू नये. लगेच राजीनामा दिला पाहिजे. आरोप होताच मंत्र्यांनी प्रथम राजीनामा देवून बाहेर पडले पाहिजे. माझे वय ९० वर्ष झाले आहे. या ९० वर्षांचा वयात एकसुद्धा डाग नाही. तसेच जीवन मंत्रिमंडळातील लोकांनी जगले पाहिजे. सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांना त्यांचे नेहमी आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजे.'

पहा संपूर्ण व्हिडिओ 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने