ब्युरो टीम : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या 'छावा' चित्रपटाने संपूर्ण देशभरात सध्या धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली जात आहे. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
पुणे येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, वीरता आणि विद्वत्ता प्रचंड होती पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. अशा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित अतिशय चांगला असा हा सिनेमा तयार झाला आहे. इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता हा सिनेमा तयार करण्यात आला केला. त्यासाठी मी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते विकी कौशल यांचे अभिनंदन करतो. हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. इतर राज्य चित्रपट टॅक्स फ्री करतात त्यावेळी करमणूक कर माफ करत असतात. पण महाराष्ट्राने २०१७ सालीच करमणूक कर नेहमीकरिता रद्द केला आहे. त्यामुळे चित्रपट करमुक्त करण्यासाठी आपल्याकडे तो करच नाही. पंरतू, या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक काय चांगले करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. छत्रपती संभाजी महाराजांना अपमानित करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू आणि असे वागणाऱ्यांना सरकार आणि शिवप्रेमी माफ करणार नाहीत,' असे ते म्हणाले.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा