Chhaava : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ‘छावा’ चित्रपटाचे कौतुक


ब्युरो टीम : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या 'छावा' चित्रपटाने संपूर्ण देशभरात सध्या  धुमाकूळ घातला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. दिल्लीत पार पडलेल्या पार पडत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मोदी यांनी छावा चित्रपटाचे कौतुक केले. 

'मुंबईमुळेच मराठी आणि हिंदी चित्रपटांना उभारी मिळाली. आणि सध्या तर ‘छावा’चीधूम आहे', असे पंतप्रधान मोदी म्हणताच सभागृहात एकच जल्लोष झाला.

त्यांच्या छावाबद्दल केलेल्या वक्तव्याला टाळ्यांच्या कडकडाट करत उपस्थितांनी दाद दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात जय भवानी, जय संभाजी अशा घोषणा दिल्या गेल्या. यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कांदबरीने करून दिला.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने