विक्रम बनकर, अहिल्यानगर : जिल्हा परिषद अहिल्यानगरने सुरू केलेल्या 'मिशन आपुलकी' या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सी.जी. पॉवर कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी परीक्षा एक हजार मार्गदर्शक पुस्तिका संचाचे वितरण जिल्हा परिषद समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी जनरल मॅनेजर आनंद कुलकर्णी, प्रोडक्शन मॅनेजर पोपट भागवत, लेखाधिकारी रमेश कासार, विस्तार अधिकारी विलास साठे आदी उपस्थितीत होते. यावेळी राहुरी, शेवगाव, राहाता, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा, पाथर्डी व श्रीरामपूर या तालुक्यातील काही शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रातिनिधीक स्वरूपात मार्गदर्शक पुस्तक संचाचे वितरण करण्यात आलेले.
यावेळी आशिष येरेकर म्हणाले की, 'सी.जी.पॉवर कंपनीने यापूर्वीही त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा परिषद शाळांना भरीव स्वरूपाची मदत केलेली आहे. संच उपलब्ध करुन दिल्याबद्दल कंपनीच्या सर्व टिमचे आभार मानतो. तसेच यापुढे जिल्हा परिषद शाळांना मदतीचा ओघ असाच सुरू ठेवावा. शाळांनी या पुस्तिकांचा विद्यार्थी गुणवत्तेसाठी वापर करावा,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद शाळांसाठी नवीन वर्गखोल्या, स्वच्छतागृह, डिजिटल क्लासरूम, बेचेंस इ. प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा