Healthy Breakfast : निरोगी राहायचे आहे? मग नाश्तात करा ‘या’ पदार्थाचा समावेश



ब्युरो टीम : सकाळचा नाश्ता निरोगी आरोग्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. पण नाश्ताची सुरुवात ही पौष्टिक आहारानं करणे महत्त्वाचे आहे. दररोज सकाळी वेळेवर व पौष्टिक नाश्ता केल्यानं आरोग्यासाठी खूप फायदा होता. पण बऱ्याचदा नाश्तामध्ये तेच ते पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही नाश्तात सहज खाऊ शकता, शिवाय तुम्हाला तो आरोग्याच्या दृष्टिनेही खूप फायदेशीर आहे. हा पदार्थ म्हणजे बेसन चिल्ले.

चला तर, नाश्तामध्ये बेसन चिल्ले खाण्याचे तुम्हाला नेमके काय फायदे होतील, याबाबतच आज आपण जाणून घेऊ.

पचनक्रिया सुधारते

बेसन चिल्ल्यात असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. पचन प्रक्रिया सुरळीत ठेवते. यासोबतच बेसनामध्ये प्रोबायोटिक्स देखील असतात, जे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवतात.

प्रथिनांचा उत्तम स्रोत

बेसन हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. शरीराच्या ऊतींच्या दुरुस्ती आणि विकासासाठी प्रथिने आवश्यक असतात. त्यामुळे नाश्त्यात बेसन चिल्ले खाल्ल्यानं तुम्हाला पुरेशी प्रथिने मिळू शकतात. ज्यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहते. शाकाहारी लोकांसाठी हा प्रथिनाचा उत्तम स्त्रोत आहे.

हृदयासाठी फायदेशीर

बेसनामध्ये फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही हे उपयुक्त ठरते. त्यामुळे नाश्त्यात बेसन चिल्ले नियमित खाल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो.

त्वचा व केसांसाठी होतो फायदा

बेसनामध्ये त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असणारे व्हिटॅमिन बी आणि इतर पोषक घटक असतात. बेसन चिल्ले खाल्यानं त्वचेची चमक वाढते, केस मजबूत होतात. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि केसगळती कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहेत.

वजन नियंत्रणात राहील

बेसन चिल्ले हे जास्त प्रमाणात फायबरयुक्त असतात, ज्यामुळे ते खाल्यानंतर तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. भूक नियंत्रित राहते, आणि अनावश्यक खाणे टाळण्यास मदत होते. ग्लायसेमिक इंडेक्स बेसिन चिल्ल्यात कमी असतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, व वजन कमी होण्यास मदत होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने