ब्युरो टीम : 'देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बांगलादेशी घुसखोर देशातून हद्दपार करा, बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, असे परखड प्रतिपादन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ‘बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातील मोर्चा’त केले.
केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी देशभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हाकलावे, यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समाप्तीनंतर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पुण्याच्या निवासी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात देशभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवून त्यांना हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली.
‘राष्ट्र की रक्षा हम करेंगे, राष्ट्ररक्षक कहलायेंगे। भगवा थामे संकल्प लिया है, हर बांगलादेशी घुसपेठीया भगायेंगे !’ असा संकल्पही या मोर्चात करण्यात आला. या मोर्चामध्ये भाजपा, योग वेदांत समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, वंदे मातरम संघटना, शिवसेना, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री स्वामी समर्थ मंदिर दिंडोरी प्रणित, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा, वारकरी संप्रदाय, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, समस्त हिंदू आघाडी, पतीत पावन संघटना, स्वा. सावरकर स्मृती प्रतिष्ठान, राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान, ॐ जय शंकर प्रतिष्ठान, सनातन संस्था आदी संघटनांसह हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री पराग गोखले, भाजपच्या रणरागिणी शाखेच्या उज्ज्वला गौड, तसेच मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी सहभागी झाले होते.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा