Kopargaon crime : कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या 5 व्यावसायिकांवर छापे


ब्युरो टीम : कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांविरूध्द पंचासमक्ष पाच वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

वाचा : 'पीसीएमसी'चे ९६७५ कोटी २७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर

२० फेब्रुवारी २०२५ रोजी पथकाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे चालणाऱ्या ठिकाणची माहिती काढुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरूध्द पंचासमक्ष पाच वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. कारवाईमध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला  महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार पाच गुन्हे दाखल करण्यात येऊन ७० हजार ४५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस  निरीक्षक  दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने