विक्रम बनकर, अहिल्यानगर : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे शुक्रवार (२८ फेब्रुवारी) रोजी मानाची होळी पेटवून श्री कानिफनाथ यात्रेचा शुभारंभ झाला आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत होळी पूजन करून होळी पेटवण्यात आली.
#Madhi | #मढी येथील मानाची #होळी पेटवल्यानंतर #ahilyanagar चे आमदार @sangrambhaiya काय म्हणाले?#sangramjagtap #अहिल्यानगर #Maharashtra #PoliticsLive @NiteshNRane pic.twitter.com/QtA4XMaNGI
— मराठी Print (@Marathi_print) February 28, 2025
मढी ग्रामस्थांच्या वतीने पंधरा दिवस आधीच चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिरासमोर होळी पेटून होळी सण साजरा करण्यात येतो. यावर्षी मढी ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेमध्ये मुस्लिम व्यवसायिकांना दुकाने लावण्यास मज्जाव केला आहे. या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. त्यातच शुक्रवारी येथील मानाची होळी पेटवण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थित असलेले तुषार भोसले आणि आमदार संग्राम जगताप यांनी ग्रामस्थांचं अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा : प्रत्येक एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, खासदार निलेश लंके यांची मागणी
तसेच मढी देवस्थानची आजची होळी केवळ एक होळी नसून देवस्थान मुक्ती संग्रामाची सुरुवात असल्याचं त्यांनी सांगितले. तर, आमदार जगताप यांनी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं असून उद्या, शनिवारी या ठिकाणी होणाऱ्या धर्मसभेत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.
पहा व्हिडीओ :
टिप्पणी पोस्ट करा