Madhi :मढी ग्रामस्थांचे महाराष्ट्र मंदिर महासंघाने केले अभिनंदन, कारण...


ब्युरो टीम : तब्बल ७०० वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान, मढी येथील यात्रेत या वर्षी मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून तो अंत्यत योग्य असून असा निर्णय घेणाऱ्या मढी ग्रामस्थांचे अभिनंदन, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांची या प्रसिद्धी पत्रकारावर सही आहे.

वाचा : पुण्यातील धक्कादायक घटना, स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार

यात्रेच्या वेळी येथील ग्रामस्थ आणि भाविक ज्या परंपरांचे पालन करतात, त्या परंपरा पायदळी तुडवणे, धार्मिक यात्रेत जुगार-सट्टा असे अवैध धंदे करणे, महिला भाविकांची छेड काढणे, भाविकांना मारहाण करणे, असे गैरप्रकार हे मुजोर व्यावसायीक गेली अनेक वर्षे करत असल्याचे भाविकांनी सांगितले. श्री कानिफनाथ देवावर श्रद्धा नसणाऱ्या पण केवळ आर्थिक लाभासाठी धार्मिक यात्रेत येऊन असे गैरप्रकार करून यात्रेचे पावित्र्य भंग करणाऱ्या, तसेच भाविकांना त्रास देणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर बंदी घालणेच सर्वथा योग्य आहे. अनेक राज्यांत असे अनुभवायला आले आहे की, बर्‍याच मंदिर परिसरांत फुलवाले मुस्लिम धर्मीय असतात. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ पाहिले असतील की, हे एक ‘अजेंडा’ म्हणजे नियोजित षड्यंत्र रचून कार्य करत असतात. बऱ्याच ठिकाणी स्वतःची ओळख लपवून, वेळप्रसंगी खोटी ओळख दाखवून ते भाविकांची लूट करतात. असे अनेक गैरप्रकार देश पातळीवर अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे मढी ग्रामस्थांचा आदर्श घेऊन सर्वत्रच्या धार्मिक क्षेत्रातील ग्रामस्थांनी असा निर्णय घेऊन यात्रेचे पावित्र्य राखावे, असेही महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने