Mahashivratri 2025 : भगवान शंकराला का अर्पण केलं जातं बेलाचं पान? जाणून घ्या



ब्युरो टीम :  हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठया भक्ती भावाने पूजा करतात आणि उपवास करतात.  जो भक्त भक्तीभावानं भगवान शंकराची आराधना करतो,  त्याला निश्चितच चांगल फळ मिळतं, अशी धार्मिक मान्यता आहे. 

पण तुम्हाला माहिती आहे का, भगवान शंकराला बेलाचे पान अतिशय प्रिय असून ते अर्पण केल्यानं मनोकामना पूर्ण होते. कारण बेलाचे पान भगवान शंकराला अतिशय प्रिय असून ते अर्पण केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात, आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, अशीही धार्मिक मान्यता आहे.

म्हणून अर्पण केले जाते बेलाचे पान

शिवपुराणानुसार समुद्रमंथनातून निघणाऱ्या विषामुळे जगावर संकट आले होते. तेव्हा भगवान शंकराने विश्वाचं रक्षण करण्यासाठी ते विष पाषण केले होते. पण त्यामुळे भगवान शंकराच्या शरीराचं तापमान वाढू लागलं, आणि संपूर्ण जगातील तापमान वाढू लागलं. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचे जीवन संकटात आले. अखेर सृष्टीच्या हितासाठी विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवांनी भगवान शंकराला बेलाची पाने खाऊ घातली. ही पाने खाल्ल्याने विषाचा प्रभाव कमी झाला,  तेव्हापासून भगवान शंकराला बेलाची पाने अर्पण करण्याची प्रथा आहे, अशी धार्मिक मान्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने