ब्युरो टीम : महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान भोलेनाथाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच भवान शंभूला प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण केल्या जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते बेलाचे पान.
पण तुम्हाला माहिती आहे का, भगवान शंकराला बेलाचे पान अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? चला तर याबाबत जाणून घेऊ.
बेलाचे पान असे करा अर्पण
धार्मिक ग्रंथांमध्ये सर्व देवतांची पूजा करण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. शास्त्रात भगवान शंकराला बेलाचे पान अर्पण करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार, भगवान शंकराला 3 पेक्षा कमी पाने असलेला बेल अर्पण करू नये. कापलेली बेलाची पाने भगवान शंकराला अर्पण करू नयेत. तसेच केवळ 3, 5, 7 सारख्या विषम संख्या असलेलं बेलाचे पान अर्पण करावे. 3 पाने असलेले बेलपत्र हे त्रिदेव आणि शिव यांच्या त्रिशूलाचे रूप आहे, अशी मान्यता आहे.
बेलाचे पान नेहमी मध्यभागी, अनामिका आणि अंगठ्याने पकडून ते भगवान शंकराला अर्पण करावे. बेलाचे पान हे कधीही अपवित्र नसते, अशी मान्यता आहे. त्यामुळेच पूर्वी अर्पण केलेलं बेलाचे पान धुऊन पुन्हा भगवान शंकराला अर्पण केले जाऊ शकते. बेलाचे पान अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला नेहमी पाण्यानं अभिषेक करावा. या नियमांनुसार बेलाचे पान अर्पण केल्यानं भगवान शिव लवकर प्रसन्न होतात, आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी मान्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा