Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला अशी करा शिवलिंगाची पूजा, भोलेनाथ होतील प्रसन्न

ब्युरो टीम :  हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादिवशी उपवास करून भगवान भोलेनाथची पूजा करण्याची परंपरा आहे. 

यंदा हा उत्सव २६ फेब्रुवारी म्हणजेच आज साजरा होत आहे.  महाशिवरात्रीलं शिवलिंगाची पूजा अनेकजण करतात. तसेच प्रत्येक सोमवारीही शिवलिंगाची पूजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही पूजा करण्याची पद्धत व काही महत्त्वाचे नियम आहेत. चला तर, याबाबतच आज जाणून घेऊ.

धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्री शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. यादिवशी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराच्या निराकार स्वरूपाची म्हणजेच शिवलिंगाची विधिवत पूजा केल्यास, शिवशंकर प्रसन्न होतात. अशी पूजा केल्यानं भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. पण शिवलिंगाची पूजा करताना योग्य पद्धत व महत्त्वाचे नियम पाळणेही तितकचं महत्त्वाचं आहे. 

अशी करा पूजा

धार्मिक मान्यतेनुसार भगवान भोलेनाथची पूजा अत्यंत सोपी आणि फलदायी मानली जाते. कारण केवळ जल आणि बेलाची पाने अर्पण केल्यानं देखील ते प्रसन्न होतात. गंगाजल भगवान शंकराला खूप प्रिय आहे. ते शिवलिंगावर अर्पण केल्यानं साधकाला इच्छित फळ मिळते. परंतु गंगाजल नेहमी तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगावर अर्पण करावे. प्लास्टिकच्या भांड्यातून चुकूनही गंगाजल अर्पण करू नये. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी साधकाचे शरीर आणि मन शुद्ध होणं महत्त्वाचं आहे. तसेच काळे कपडे घालून शिवाची पूजा कधीही करू नये. शिवलिंगाला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने