Pankaja Munde : तर एखादा पक्ष उभा राहील, पंकजा मुंडे यांचे वक्तव्य


ब्युरो टीम : 'गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील,' असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (९ फेब्रुवारी) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाणं आलं आहे.

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे या ९ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी एक सूचक विधान केलं आहे.

'गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील', असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. त्या पुढे म्हणाल्या,'गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्यावर प्रेम करणारे हे सर्व लोक गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात. गुणांवर प्रेम करतात. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभा आहे. भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून गोपीनाथ मुंडे यांनी काम करून पक्ष उभा केला,' असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळून प्रतिक्रिया येत आहेत.


पहा व्हिडीओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने