ब्युरो टीम : '२३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’ चे उदघाटन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार आहे. हा सोहळा स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे,' अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा ‘’शो मॅन ; राज कपूर’’ या थीमवर हा महोत्सव होणार असून याबाबत डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते.
'यंदा प्रख्यात चर्मवाद्यवादक विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल .उद्घाटन सोहळ्यानंतर Gloria, Country: Italy, Switzerland ,Dir : Margherita Vicario हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) म्हणून दाखवण्यात येणार आहे,). तर The Room Next Door ,Country: Spain ,Dir: Pedro Almodovar या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असल्याचे,' डॉ. पटेल यांनी सांगितले.
यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्यूरींच्या नावाची घोषणा अभिजित रणदिवे यांनी केली. यामध्ये मार्को बेकिस - चिली-इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, मार्गारिवा शिल - पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षिका,पेट्री कोटविचा - फिनिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक , तामिन्हे मिलानी - इराणी चित्रपट दिग्दर्शक , जॉर्जे स्टिचकोविच - सिनेमॅटोग्राफर सर्बिया, सुदथ महादिवुलवेवा - श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक, अर्चना - दक्षिण भारतीय अभिनेत्री,अनिरुद्ध रॉय चौधरी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा समावेश आहे.
समर नखाते म्हणाले, 'या महोत्सवात फिल्म सिटीच्या एमडी – स्वाती म्हसे पाटील यांचे चर्चासत्र – १४ फेब्रुवारी आणि प्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शकांशी चर्चा (उमेश कुलकर्णी, अनुपमा श्रीनिवासन, सर्वनिक कौर, कुलदीप बर्वे – १५ फेब्रुवारी) हे वर्कशॉप होणार आहेत.'
ज्येष्ठ साहित्यसम्राट विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यान – बोमन इराणी – १६ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे .सिनेमा अँड सोल ; तपन सिन्हा – (स्वपनकुमार मल्लिक आणि गौतम घोष – १७ फेब्रुवारी), Ai फिल्म्सच्या माध्यमातून चित्रपटाच्या आशयाची निर्मिती - पॅको टोरेस (१८ फेब्रुवारी) आणि मराठी पॅनल: मराठी चित्रपटातील आव्हाने: निर्मिती ते प्रेक्षक: (परेश मोकाशी, आदित्य सोरपोतदार, आदिनाथ कोठारे, सुनील फडतरे १९ फेब्रुवारी),' हे मास्टरक्लास संपन्न होईल.
१३ ते २० फेब्रुवारीदरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’ होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.
महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झाली आहे. रसिक प्रेक्षकांसाठी कॅटलॉग फी. रुपये ८०० फक्त आहे.
टिप्पणी पोस्ट करा