PIFF : कविता कृष्णमुर्ती , शुभा खोटे , अनुपम खेर यांना ‘पीफ’चे पुरस्कार जाहीर!!


ब्युरो टीम :  पुणे फिल्म फाउंडेशन व  महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे व ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर ज्येष्ठ गायिका पद्मश्री कविता कृष्णमूर्ती  यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी याबाबत माहिती दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते अभिजित रणदिवे उपस्थित होते.

पुरस्कारार्थी यांचा परिचय

शुभा खोटे :

जन्म - ३० ऑगस्ट, १९३७ ,मराठी तसेच हिंदी भाषेतील चित्रपटात व दूरचित्रवाहिनी मालिकात काम केले आहे.पावणे दोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांची मोठी कारकीर्द आहे. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले. त्यानंतर त्यांची कारकीर्द चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून गाजली.क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या शुभा खोटे यांना एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी १९५५ साली त्यांना ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. 'पेईंग गेस्ट’या चित्रपटात त्यांनी खलनायिका होती. मेहमूद, शुभा खोटे आणि धुमाळ हे ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके अनेक चित्रपटात काम केले. एक दूजे के लिये,चिमुकला पाहुणा (मराठी चित्रपट),छोटी बहन,जिद्दी,दिल एक मंदिर,दिल तेरा दिवाना,पेईंग गेस्ट,भरोसा,ससुराल,सीमा हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.

कविता कृष्णमूर्ती :

कविता कृष्णमूर्ती उर्फ  शारदा कृष्णमूर्ती  म्हणून जन्म , 25 जानेवारी 1958, कविता यांनी हिंदी , बंगाली , कन्नड , राजस्थानी , भोजपुरी , तेलगू , ओडिया , मराठी , इंग्रजी , उर्दू , तमिळ , मल्याळम , गुजराती , नेपाळी , आसामी , कोकणी , पंजाबी आणि इतर भाषांसह विविध भाषांमध्ये असंख्य गाणी रेकॉर्ड केली आहेत त्यांना चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार  आणि  2005 मध्ये पद्मश्री मिळाले .. कविता यांच्या पार्श्वगायन करिअरची सुरुवात कन्नड भाषेतील चित्रपटांपासून झाली. त्यांनी एकूण 18 हजारांहून अधिक गाणी गायली. आंख मारे (चित्रपट - तेरे मेरे सपने), तू चीज बडी है मस्त मस्त (चित्रपट -मोहरा), डोला रे डोला ( चित्रपट – देवदास). अशी त्यांची असंख्य गाणी गाजली.

अनुपम खेर :

अनुपम खेर (जन्म ७ मार्च १९५५). चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 540 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे . खेर यांना त्यांच्या अभिनयासाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत . [ २ ]  त्यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले .खेर यांच्या इतर प्रशंसित भूमिकांमध्ये  ए वेनस्डे! (2008),  एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (2016) आणि द काश्मीर फाइल्स (2022); या त्यांच्या कलाकृती अविस्मरणीय ठरल्या. पुण्यातील  फिल्म अंड टेलिव्हिजन ईनस्टीट्युट ऑफ इंडियाचे ते काहीकाळ संचालक होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने