ब्युरो टीम : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीची ओळख पटली असून या प्रकरणाबाबत पुण्याच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपीने पीडित मुलीला एकटी असल्याचं पाहून तिच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. पीडित मुलीसोबत गोड बोलून ओळख केली. त्यानंतर कुठे जाणार असे विचारले मग तिने फलटणला जाणार असल्याचं सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडितेला सांगितले की, साताऱ्याला जाणारी बस इथे लागत नाही पलिकडे लागते. यावर पीडित तरुणीने बस इथेच लागते असे म्हटले. पण आरोपीने या तरुणीला बस इथे लागत नाही दुसरीकडे लागते असे सांगत तिला तिकडे नेलं.यानंतर पीडित मुलगी आरोपीसोबत बस जवळ गेली. पण बसमध्ये अंधार असल्याने पीडित मुलीने आरोपीला याबाबत विचारले. त्यावर आरोपीने सांगितले की, बस रात्री उशिराची असल्याने अनेकजण झोपले आहेत त्यामुळे लाईट्स बंद आहेत. तुम्ही बसमध्ये चढून तपासू शकता. असे म्हटल्यावर पीडित मुलगी बसमध्ये शिरुन मोबाईल टॉर्चने पाहू लागल्यावर आरोपी बसमध्ये चढला आणि त्याने बसचा दरवाजा लावून पीडित मुलीवर अत्याचार केला.'
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी निष्पन्न
'घटनास्थळावरचे सीसीटीव्ही आम्ही ताब्यात घेतले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे. आरोपी हा शिरुर परिसरातील आहे. आरोपीच्या विरुद्ध शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या आठ टीम्स तैनात आहेत. डॉग स्कॉडच्या मदतीने सुद्धा तपास सुरू आहे,'असेही पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा