ब्युरो टीम : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा आता सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.
पुणे स्वारगेट परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना केलेल्या आहेत. 'माझ्या शहरातील कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही,'अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी यावेळी दिली आहे. या शहरातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी जे जे काही आवश्यक असेल त्यासाठी आम्ही पोलिसांच्या सोबत आहोत,'असेही मोहोळ म्हणाले.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा