Pune Crime :आरोपी दत्तात्रय गाडेला कसे पकडले? पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली महत्त्वाची माहिती


ब्युरो टीम : पुणे येथील स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार करून पसार झालेला आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. गुनाट, ता. शिरुर, जि. पुणे) याला पोलिसांनी मध्यरात्री गुनाट गावातून अटक केली आहे. पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

'काल रात्री स्वारगेट डेपोतील बस अत्याचार प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतलं. त्याला गुनाट गावातून पथकाने ताब्यात घेतलं. तीन दिवसापासून ऑपरेशन सुरु होतं. स्वारगेट पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच अंदाजे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशनमध्ये होते. स्थानिक नागरिक 400 ते 500 लोकांचं सहकार्य मिळालं. आमचे डॉग स्क्वॉड वेगवेगळ्या ठिकाणी गेले. ऊसाचं शेतं श्वानाने दाखवले होते. ड्रोनचा वापर करून आरोपी ट्रेस झाला होता. या प्रयत्नानंतर काल 1 वाजून 10 मिनिटाने आरोपीला ताब्यात घेतलं. सकाळी प्रक्रिया पूर्ण करून अटक केली,' असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

गाडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले,' गुन्हा घडल्यानंतर काही तासात आराेपी गाडेने तरुणीवर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले. फिर्याद दाखल होण्याचे काम सुरू असतानाच आरोपीचे नाव निष्पन्न झाले होते. गाडेला जानेवारी २०२४ मध्ये स्वारगेट परिसरात एका प्रवाशाच्या मोबाइल चोरी प्रकरणी अटक झाली होती. २०१९ मध्ये गाडेविरुद्ध पुणे ग्रामीण, तसेच अहिल्यानगर ग्रामीण पोलिसांकडून लुटणारीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने