Pune :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुणे येथे आगमन


ब्युरो टीम: प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-२ सन २०२४-२५ अंतर्गत उद्या २२ फेब्रुवारी रोजी श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण तसेच अन्य दोन कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले. 

वाचा : 'पीसीएमसी'चे ९६७५ कोटी २७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, एअर कमांडर सतवीर सिंग रॉय, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले,पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने