विक्रम बनकर, अहिल्यानगर : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी राळेगणसिद्धी येथील हिंद स्वराज्य ट्रस्टच्या प्रशिक्षण सभागृहात डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथील विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला. त्यापूर्वी शिंदे यांनी यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
हेही वाचा : पुण्यातील धक्कादायक घटना, स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार
राळेगणसिद्धी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. राम शिंदे म्हणाले, 'प्रत्येक क्षेत्रात जिद्द, मेहनत आणि विश्वास या त्रीसूत्रीच्या जोरावर यश संपादन करणे शक्य आहे. तसेच यावेळी प्रा. शिंदे यांनी त्यांच्या जीवनाचा सरपंच पदापासून ते सभापती पदापर्यंतच्या कारकिर्दीत आलेल्या अनुभवांची माहिती देण्यासोबत विधान परिषदेच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी प्रा.नीलम पंडित, संध्या सोनवणे उपस्थित होत्या
टिप्पणी पोस्ट करा