Rekha Gupta Dehli CM : दिल्लीत महिलराज! मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता


ब्युरो टीम : दिल्ली येथे  नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्य, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, खासदार आणि एनडीए घटक पक्षांचे नेते उपस्थित  होते.

रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.  गुप्ता यांच्यासह सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंद्र इंद्रराज, कपिल मिश्रा आणि पंकज सिंह यांचा समावेश आहे.



कोण आहेत रेखा गुप्ता?

  • एलएलबी पदवीधर असलेल्या गुप्ता यांचा जन्म सन १९७४मध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना उपविभागातील नंदगड गावात झाला. 
  • गुप्ता यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक होते. त्या दोन वर्षांच्या असताना कुटुंबासह दिल्लीत राहण्यास आल्या. त्यांची जडणघडण दिल्लीतच झाली. 
  • दिल्ली विद्यापीठात शिकतानाच त्यांनी अभाविपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही काम केले आहे.
  • रेखा गुप्ता यांनी शालिमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने