ब्युरो टीम : अयोध्या येथील श्री रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास (वय ८७) यांचे बुधवारी (१२ फेब्रुवारी) रोजी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर लखनौच्या एसजीपीजीआयमध्ये उपचार सुरू होते.
रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, 'अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी श्री. सत्येंद्र दासजी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांना ३ फेब्रुवारी रोजी स्ट्रोकमुळे गंभीर अवस्थेत न्यूरॉलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.'
टिप्पणी पोस्ट करा