shirdi crime : दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये खळबळ, पहाटेच्या सुमारास घडली घटना


ब्युरो टीम : दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले.  यामध्ये  सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही शिर्डीच्या साई संस्थानचे कर्मचारी आहेत. तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आज, सोमवारी (३ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

साई संस्थानचे दोन कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर पहाटेच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले. यापैकी साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर कृष्णा देहरकर गंभीर जखमी अवस्थेत आहे.

दरम्यान, साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांची एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हत्या होणं हा योगायोग आहे की यामागे काही कारण आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने