Ujjwal Nikam : संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होताच उज्ज्वल निकम म्हणाले...


ब्युरो टीम :  बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पुणे येथे माध्यमांशी बोलताना निकम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी  मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करताना म्हंटले की,'बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून माझी नियुक्ती व्हावी, अशी मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी होती. काल त्यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली, हे ऐकून मी खूप व्यथित झालो. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं, की मी हा खटला चालवायला तयार आहे. त्यानुसार यासाठी त्यांनी आज आदेश पारित केले. मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. याचप्रमाणे मस्साजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेन, की आपण हे उपोषण सोडावं. कारण या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. आपण असं कोणतंही कृत्य करु नये ज्याने तब्येतीला त्रास होईल. तपास यंत्रणा ज्यावेळी आरोपपत्र दाखल करतील, तेव्हा खटला तातडीने चालवायला घेऊ, असं मी तुम्हाला आश्वासन देतो, असंही निकम यांनी स्पष्ट केले.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने