ब्युरो टीम : अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश अनंत देशपांडे यांच्या मातोश्री पुष्पा देशपांडे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे विवाहित मुलगी, मुलगा, सून, दोन विवाहित नातवंडे, नात सुना, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर नालेगांव येथील अमरधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असायचा.
टिप्पणी पोस्ट करा