ब्युरो टीम : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडवर अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी ( २ मार्च) रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना झाला. या सामन्यात वरूण चक्रवर्तीने भेदक गोलंदाजी करीत १० षटकांत ४२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी मोठा विजय नोंदवला, व उपांत्य फेरी गाठली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय टीम अपराजित आहे. भारताने गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले आहेत. आता उद्या, मंगळवारी (४ मार्च) रोजी दुबईच्या मैदानावर टीम इंडियाची उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना बुधवारी (५ मार्च) न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना लाहोरच्या मैदानावर होईल.
टिप्पणी पोस्ट करा