Chhaava Movie Collection : रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडत निघालाय 'छावा', वाचा आतापर्यंत किती कमावले

ब्युरो टीम : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट सर्वांचे मन जिंकत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित असणाऱ्या या चित्रपटात विकी कौशल यांनी केलेल्या अभिनयाचंही मोठं कौतुक होत आहे. दुसरीकडे, या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई सुद्धा जोरात सुरू असून चित्रपटाचं कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. 

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने २२ व्या दिवशी ८.७५ कोटी रुपये कमावले आहेत. आता या चित्रपटाचे २२ दिवसांचे एकूण कलेक्शन हे जवळपास ४९२.३ कोटींचे झाले आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईच्या भूमिकेत, अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत, आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहितेच्या भूमिकेत, दिव्या दत्ता सोयराबाईच्या भूमिकेत आणि डायना पेंटी औरंगजेबची मुलगी झीनत-उन-निसा बेगमच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट जगभरात लोकप्रिय झाला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने