ब्युरो टीम : रिक्षा, मोटार सायकल चोरीसह चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद करण्यात अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीकडून 3,50,000/-रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 गुन्हे उघडकीस आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 24/04/2024 रोजी फिर्यादी संगीता पुंडलीक मोरे (रा.आदिशक्ती बंगलो, दातरंगे मळा, अहिल्यानगर) या कल्याण रोडने जात असताना यातील अज्ञात आरोपीतांनी मोटार सायकलवर येऊन, त्यांचे गळयातील सोन्याची चैन ओढुन चोरून नेली.याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्हयातील उघडकीस न आलेले चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अनंत सालगुडे, व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, भगवान थोरात व महादेव भांड अशांचे पथक नेमुण जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 27/02/2025 रोजी पथक कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगमधील आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,केडगाव येथून लिंक रोडने अहिल्यानगर शहराकडे एक चोरीची रिक्षा विक्री करण्यासाठी येणार आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून कल्याण लिंक रोडला सापळा रचुन संशयीत रिक्षा थांबवून, त्या रिक्षा चालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोन्या उर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय 30, रा.टिळक रोड, कानडे प्रेशर पंपाजवळ, अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. ताब्यात रिक्षाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची रिक्षा ही पुणे येथून चोरून आणलेबाबत माहिती दिली. पंचासमक्ष आरोपीस विश्वासात घेऊन आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्याने 8 -10 महिन्यापुर्वी अहिल्यानगर पुणे रोड स्वीट होम येथून एका महिलेच्या गळयातील सोन्याची चैन ओढुन चोरी केली. तसेच मागील 2 दोन महिन्यापुर्वी केडगाव येथून एक मोपेड गाडी योगेश संजय रक्ते (रा.गॅस कंपनी चौक, एमआयडीसी, अहिल्यानगर) (फरार) याचे मदतीने चोरी करून ती श्रीसिध्दीविनायक ट्रेडर्स समोरील काटवनात लपवून ठेवली असलेबाबत माहिती दिली आहे.
पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी सोन्या उर्फ सुरज शिवाजी शिंदे याची अंगझडती घेऊन त्याचे ताब्यातुन 70,000/- रू कि.त्यात 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 2,00,000/- रू कि.त्यात काळी पिवळी रिक्षा व 80,000/- रू किं.त्यात एक मोपेड गाडी असा एकुण 3,50,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीने वरीलप्रमाणे गुन्हे केल्याच्या सांगितलेल्या माहितीवरून, अभिलेखाची पडताळणी करून कोतवाली पोलीस स्टेशन व चाकण पोलीस स्टेशनचे खालीलप्रमाणे 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा