ब्युरो टीम : आज ८ मार्च जागतिक महिला दिन. आजचा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून सोशल मीडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या संदेश पोस्ट करण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे.
2025 च्या महिला दिनाची थीम 'अॅक्सिलरेट अॅक्शन' ही महिला समानता आणि सक्षमीकरणाकडे वेगाने जाण्याचा संदेश देते. महिलांच्या संघर्षांचा आणि कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त मंत्री रामदास आठवले यांनी खास पोस्ट केली आहे.
मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, 'ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे, आणि सुरुवात नसेल तर बाकी सारे व्यर्थ आहे.’
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 8, 2025
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा