ब्युरो टीम : आज ८ मार्च जागतिक महिला दिन. हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर देखील शुभेच्छांचा वर्षाव यानिमित्ताने दिसत आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यामध्ये कलाकार मंडळी देखील आघाडीवर आहेत. लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही महिला दिनानिमित्त खास पोस्ट केली आहे.
केदार शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर महिला दिनानिमित्त खास पोस्ट टाकताना त्यासोबतच पत्नी बेला शिंदे आणि मुलगी सना शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. चला तर, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महिला दिनानिमित्त नेमकं काय म्हंटले आहे, ते जाणून घेऊ.
दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट जशीच्या तशी
आज जागतिक महिला दिन. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात स्त्री ही अविभाज्य घटक असते. कारण जन्म देणारीच एक स्त्री असते. पुढे आयुष्यात अनेक स्त्रिया आपल्या आयुष्यात येतात. आईपासून सुरुवात जरी झाली तरी, मावशी, आत्या, आजी, काकू.. ते शाळा कॉलेजात शिक्षिका…पण पुन्हा एक वळण येतं जेव्हा लग्न होतं. बेला माझ्या आयुष्यात येणं हा टर्निंग पॉइंट होता. मी एकांकिका स्पर्धेत धडपडणारा…अचानक संसाराची जबाबदारी अंगावर पडल्यावर, हातपाय मारू लागलो. माझ्या नाटक, मालिका, सिनेमाच्या प्रवासात अनेक चढउतार आले, येतायत, येतील…खंबीरपणे साथ देणारी ‘ती’ माझ्याबरोबर आहे. त्यानंतर मुलीच्या रुपात आयुष्यात आली ‘ती’..,सना शिंदे…तिने जबाबदारी बरोबरच मॅच्युअर बनवलं.
आज माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे सना. आजच्या टेक्नॉलॉजी युगात अपग्रेट राहण्याचा मार्ग म्हणजे सना. या दोघी नसतील तर मी शून्य आहे. मी ३६५ दिवस त्यामुळेच महिला दिन साजरा करतो, अशी पोस्ट केदार शिंदे यांनी लिहिली असून ती वेगानं व्हायरल होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा