ब्युरो टीम : केळी खाणं अनेकांना आवडत असले तरी चांगली केळी कशी निवडावी, हे अनेकांना माहिती नसते. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही केळीचं देठ पाहून त्यावरून ती निवडू शकता.
केळी हे वर्षभर आढळणारे फळ आहे, जे खायला सर्वांनाच आवडते. आरोग्याच्या दृष्टिनेही केळी खाण्याचे खूप फायदे आहेत. केळीमध्ये फायबर असते, जे पचनसंस्था मजबूत करते. केळी खाल्यानं वजन नियंत्रणात राहते, एनर्जी वाढते, हृदयासाठी देखील केळी खाणं फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, केळीच्या आकारावरून त्याची चव कशी आहे, हे ओळखता येते.
केळीमध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हालाही केळी खाणं आवडत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही बाजारातून केळी विकत घेता, तेव्हा ती ताजी दिसतात. पण घरी आणल्यावर ती काळी आणि खराब होऊ लागतात. डिजिटल क्रिएटर सुमन रंगनाथ यांनी नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी केळीचा आकार पाहून त्याची चव ओळखता येऊ शकते, असा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये सुमन रंगनाथ सांगताना दिसतात की, ‘मी केळीवर रिसर्च केला असून यामध्ये असं आढळून आलं आहे की, लहान देठ असणारी केळी ही मोठ्या देठ असणाऱ्या केळीपेक्षा जास्त गोड असतात.’
तज्ज्ञ म्हणतात...
‘केळी पिकण्यास केळीचे देठ उपयुक्त ठरते,’ असं एका आहारतज्ज्ञांन सांगितलं आहे. त्यांच्या मते, ‘केळीमध्ये इथिलीन नावाचा हार्मोन तयार होतो, जे केळी गोड होण्यास मदत करते. केळी वेगवेगळी ठेवल्यानं ती लवकर पिकत नाहीत. त्यामुळे ती घडापासून वेगळी करू नयेत.’ तर, काही तज्ज्ञ हे देखील मान्य करतात की, ‘केळीच्या देठाचा संबंध हा केळीचा गोडवा किंवा पिकण्याशी असतो, याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. पण केळीच्या देठावरून केळीची स्थिती काही प्रमाणात कळू शकते.’
टिप्पणी पोस्ट करा