ब्युरो टीम : भारतीय क्रिकेट टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट राखून पराभव करत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय टीमच्या विजयाचे शिल्पकार मोहम्मद शमी आणि विराट कोहली ठरले.
ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २६५ धावांचे आव्हान दिले होते. धावांचा पाठलाग करताना भारताने सुरूवातीला २ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यासह भारताला सामन्यात कायम ठेवलं. विराट कोहली पाच चौकारांसह ९८ चेंडूत ८४ धावा करत बाद झाला. विराटने उत्कृष्ट फलंदाजी करत सर्वाधिक धावा एकेरी धाव घेत काढल्या आणि ऑस्ट्रेलियावर दबाव वाढवला. तर श्रेयस अय्यरने ४५ धावांची खेळी केली. तर अक्षरने २७ धावांची खेळी केली.हार्दिकने शानदार ३ षटकार आणि एक चौकार लगावत संघाचा विजय सोपा केला आणि २८ धावांची खेळी करत बाद झाला. तर केएल राहुल ४२ धावा करत नाबाद परतला.
टिप्पणी पोस्ट करा