IND vs NZ: 'वरूण'च्या चक्रात फलंदाज अडकले, भारताचा न्यूझीलंडवर विजय


ब्युरो टीम : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडवर  अटीतटीच्या सामन्यात  विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. तसेच भारतीय टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीत गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत पोहोचला आहे.



दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी ( २ मार्च) रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना झाला. नाणेफेक गमावत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता आणि भारताची सुरूवात खूपच खराब झाली. भारताने ३० धावांमध्ये ३ विकेट गमावले होते. यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने ७९ धावांची तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. भारताने  २५० धावांचे लक्ष्य न्यूझीलंडला दिले. हे लक्ष्य  न्यूझीलंड सहज गाठेल असं वाटत होते. 



पण आपला पहिला चॅम्पियन्स ट्रॉफी सामना खेळत असलेल्या वरूण चक्रवर्तीने भेदक गोलंदाजी करीत १० षटकांत ४२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. अक्षर, जडेजा, हार्दिकने प्रत्येकी १-१ विकेट तर कुलदीपने २ विकेट्स घेत चांगली साथ दिली .  या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी मोठा विजय नोंदवला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने