ब्युरो टीम : युवक, युवतींना उद्योग क्षेत्रात रोजगारक्षम बनविण्यासाठी पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यात ३३५ पदांसाठी संधी उपलब्ध असून इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर येथील सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांनी केले आहे.
पुढील पाच वर्षामध्ये एक कोटी तरूणांना इंटर्नशिप देण्यासाठी अग्रगण्य अशा ५०० कंपन्यांसोबत केंद्र शासनाने करार केला आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक इंटर्नसाठी रूजू होतेवेळी एकरकमी ६ हजार रुपये व प्रतिमाह ५ हजार रुपये एकूण ६६ हजार रुपयांचे वार्षिक अनुदान दिले जाईल.
पूर्णवेळ शिक्षण घेणारे किंवा बेरोजगार २१ ते २४ वर्ष वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा लाखापेक्षा जास्त नसावे. कुटंबातील एकही सदस्य शासकीय नोकरीमध्ये नसावा.
अहिल्यानगर जिल्ह्यात एक्साईट इंडस्ट्रिल लि., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., जुबीलॅन्ट फुडवर्क लि., रिलायंस इंडस्ट्रिज लि., हिन्दुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., गोदरेज कंझ्यूमर प्रॉडक्ट लि., बजाज ॲटो लि., टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस लि, हॅवल्स इंडिया लि, एचडीएफसी बँक लि, बजाज फायनान्स लि व सिग्नीफाय इनेाव्हेशन्स इंडिया लि. आस्थापनांमध्ये एकूण ३३५ या पदांसाठी संधी उपलब्ध झालेली आहे. या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी https://pminternship.mca.gov.in या लिंकवर नाव नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी काही अडचण आल्यास योजनेचे समन्वयक वसिमखान पठाण यांच्याशी ९४०९५५५४६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा