Nashik : नाशिक महानगरपालिकेचे कुंभमेळा संदर्भात नियोजन सुरू


ब्युरो टीम : नाशिक महानगरपालिकेच्या कुंभमेळ्यासंदर्भातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने  मंगळवारी, ४ मार्च २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी पाहणी केली. या पाहणीत रस्ते, वाहनतळाच्या जागा, भाविकांसाठी होल्डिंग प्लेस, शेल्टर शेड, सांस्कृतिक व धार्मिक प्रदर्शनाच्या जागा, डिजिटल म्युझियम साठी जागा, नदीकाठावरील रामघाट, रेल्वे स्थानक परिसर, बस डेपो इत्यादींचा समावेश आहे.

मुख्य कामांचे मुद्दे:

1. भाविक ग्राम व पार्किंग:

 • संभाजी स्टेडियम येथे भाविक ग्राम आणि पार्किंगची उभारणी साठी पाहणी 

 2. रस्त्यांची कामे:

 • पाथर्डी–वडनेर रस्त्याची पाहणी 

 • वडनेर गेटपासून वडनेर गावपर्यंत मिलटरी क्षेत्रातील रस्त्याची पाहणी 

 • वडनेर येथे वालदेवी नदीवर अतिरिक्त पूल बांधणेच्या दृष्टीने पाहणी 

 • वडनेर गाव ते विहितगाव (देवळाळी कॅम्प/भागूर रोडपर्यंत) या भागातील रस्तांची पाहणी 

 3. इतर संबंधित कामे:

 • बागूल नगर येथील अतिक्रमण काढून व सार्वजनिक शौचालय स्थलांतरित करुन रस्त्याची जागा मोकळी करणेबाबत पाहाणी 

 • सौभाग्य नगर ते बिटको चौक (देवळाळी कॅम्प रोड) रस्त्यांची पाहाणी .

 • मालधक्का रोडवर नवीन प्रस्तावित रेल्वे फ्लायओव्हरपर्यंतचे रिसर्फेसिंग (लेव्हल क्रॉसिंग दूर करून) तसेच सिटी बस डिपो आणि रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नं. ४ पर्यंतच्या ६० मीटर बाहेरील रिंग रोडाचा उर्वरित मध्यभागी भाविक ग्राम/होल्डिंग प्लेस/पार्किंग म्हणून विकासाच्या दृष्टीने पाहणी 

 . कुंभमेळ्यासाठी ठरवलेल्या ठिकाणांचे नियोजन:

 • सिन्नर फाटा-विष्णू नगर, मनपा हॉस्पिटल, मनपा स्कूल व पार्क यांना कुंभमेळ्यासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने पाहाणी.

 • एपीएमसी मार्केट परिसरात भाविक ग्राम व मध्य वाहनतळ नियोजन दृष्टीने पाहणी 

 • विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रस्त्याचा विकास, होल्डींग प्लेस व शेल्टरची उभारणी दृष्टीने पाहणी 

 • पुणे रोड (छत्रशिवाजी महाराज प्रतिमेपासून) देवी चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत येण्याचा मार्ग , तसेच रेल्वे स्टेशनपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जाण्याचा मार्ग विकसन करण्याच्या दृष्टीने पाहणी .

 • रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावर अतिक्रमण काढून टाकणे.

 • जेल रोड विकसित करणेच्या दृष्टीने पाहाणी

 • दसक राम घाट, पुणे रोड व रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या भाविकांसाठी स्नानगृहाचे नियोजन व दसक राम घाटाचा पूलाच्या वरच्या भागापर्यंत विस्तार करणेच्या दृष्टीने पाहणी 

 • संभाजी नगर रस्त्यावर पार्किंग  क्षेत्रासाठी योग्य जागा ठरविणे.

 • जेल रोडवरील नाट्यग्रुहाची जागा येथे प्रदर्शन केंद्र, केएन केळा स्कूल व शिखरेवाडी मैदानाच्या अंतर्गत पार्किंग व शेल्टरचे नियोजन दृष्टीने पाहाणी 

 • गांधीनगर वसाहत, टाकळी/पुणे रोडवरील टाकळी घाटासाठी अंतर्गत पार्किंगची सोय.

महानगरपालिका आयुक्तांनी या पाहणीद्वारे कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या सर्व विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने