ब्युरो टीम : 'पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने 'व्हिजन@५० शहर धोरण' हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद साधून पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
'व्हिजन@५० शहर धोरण' उपक्रम अंतर्गत शनिवारी (२२ मार्च) ग.दि. माडगूळकर नाट्यगृह येथे बाह्य स्टेकहोल्डर ( External Stakeholder) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना जांभळे पाटील बोलत होते.
या कार्यशाळेस शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता मनोज सेठीया,देवण्णा गट्टुवार, उप आयुक्त विठ्ठल जोशी, अण्णा बोदडे, संदीप खोत,पंकज पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार,सहायक आयुक्त उमेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी याप्रसंगी व्हिजन@५० बाबत बोलताना सांगितले की,'पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस ११ ऑक्टोबर २०३२ रोजी महापालिका स्थापनेपासून ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने करावयाच्या आदर्श उपाययोजने बाबतीत आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करण्यात येत असून आदर्श शहराबाबतीत त्यांचे मत जाणून घेण्याच्यादृष्टीने ही कार्यशाळा यशस्वी ठरत आहे. आपल्या शहराची ओळख ही औद्योगिक नगरी म्हणून आहे. शहराचा विकास करताना शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, शहरी विकास व वाहतूक अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. लोकप्रतिनिधींपासून अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला या उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे. या अनुषंगाने अशा कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे,' असेही जांभळे पाटील यांनी सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले की, 'पिंपरी चिंचवड शहराचा विकास करण्यास महानगरपालिकेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. आता व्हिजन@५० उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचे मत विचारात घेत आहोत. महानगरपालिकेला ५० वर्ष पूर्ण करीत असताना आपल्या शहराची स्थिती काय असावी, यावर लक्ष केंद्रित करण्यास असे उपक्रम यशस्वी ठरत आहेत.'
या कार्यशाळेत नारदेव माही संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्मिता पाटील, लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसारे, लघु उद्योग संघटना फोरमचे अध्यक्ष अभय भोर, आकांक्षा फौंडेशनच्या वरिष्ठ संचालक शिवकामी कोतला, मर्दानी खेल असोसिएशनच्या अध्यक्ष संजय बनसोडे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजेन लाखे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ललितकुमार धोका, पीसीसी बॉक्सिंग असोसिएशनचे प्रकाश काकडे, पिंपरी चिंचवड होलसेल असोसिएशनचे महेश मोटवानी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल, संजय शिंदे, सीईपीएल व्यवस्थापकीय संचालक मोहन साखळकर, वास्तुविशारद अथर्वी नेत्रगावकर, इको सोल्युशन संचालक डॉ.अनुशोल गुजराथी, पिंपरी चिंचवड राष्ट्रीय घोडेस्वार प्रशिक्षण केंद्रचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, बिस्लेरीचे सीएसआर प्रतिनिधी आप्पासाहेब ढाकणे यांच्यासह विविध संघटना, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक आदींनी सहभाग घेऊन चर्चासत्रात भाग घेतला. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
विविध विषयांवर झाले विचारमंथन
व्हिजन@५० शहरी धोरण उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत 'शहरी गतिशीलता', 'पर्यावरण आणि राहणीमान', 'शिक्षण आणि नागरी कल्याण', 'तंत्रज्ञान आणि प्रशासन', 'शहरी पायाभूत सुविधा', 'आर्थिक विकास' या प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच भविष्यात नागरी समस्या उद्भवल्या तर त्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त ठरतील, यावरही विचारमंथन झाले.
टिप्पणी पोस्ट करा