PCMC : 'पीसीएमसी'ने केली अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई


ब्युरो टीम : ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. २३ व प्रभाग क्र. २४ मौजे थेरगाव येथील तुळजाई कॉलनी आणि बापुजी बुवा नगर येथील एकूण ३ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ५ हजार, २ हजार १४५ आणि ३ हजार ३६० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली एकूण ३ बांधकामे मिळून एकूण सुमारे १० हजार ५०५ चौरस फुट क्षेत्रफळ असलेली बांधकामे निष्कासित करण्यात आली. 

आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान उपअभियंता सुनिल अहिरे, कनिष्ठ अभियंता मोरे, अतिक्रमण निरीक्षक जगताप, बीट निरीक्षक सौरभ शिरसाठ, विनोद बजबळकर, पवार, मितुष सावंत उपस्थित होते. तसेच यांच्यासह धडक कारवाई पथक, २० एमएसएफ जवान, १५ मजूर, १ जेसीबी ब्रेकर, २ ट्रॅक्टर ब्रेकर व ५ हातोडे यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने