पोलीस अधीक्षक राकेश ओला स्वतः सर्व अधिकार्यांसह मिरवणूक मार्गावर तळ ठोकून होते. ड्रोनव्दारे मिरवणुकीवर वॉच ठेवण्यात आला होता.
रविवारी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक सुरू करण्यात आली. सकल हिंदू समाज, हिंदूराष्ट्र सेना, वास्तव कंपनी ग्रुप, श्रीराम सेना अशा चार संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जुन्या मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, पोलिसांनी नवीन मार्गानेच मिरवणूक जाईल, अशी व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासन ठाम राहिल्याने पंचपीर चावडी – बॉम्बे बेकरी – चांद सुलताना स्कूल – माणिक चौक मार्गे जय श्रीरामच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी पालख्या, प्रभू श्रीराम व वीर हनुमान यांची मूर्ती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे सजवलेल्या रथावर सहभागी करण्यात आले होते. ठिकठिकाणी त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणूक मार्गावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा