ब्युरो टीम : अमरावती विमानतळ व प्रवाशी विमानसेवेचा शुभारंभ बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक होणार आहे.
यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धिरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रतापदादा अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रविण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी केले आहे.
पोलीस विभागाच्या प्रशासकीय तसेच निवासस्थान इमारतींचे लोकार्पण कार्यक्रम
मुख्यमंत्री यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील मौजे कोंडेश्वर येथील व इतर ठिकाणच्या प्रशासकीय इमारती आणि निवासस्थान इमारतींचा तसेच शासकीय चारचाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम उद्या दुपारी 12 वाजता सर्वे नंबर 29, मौजा बडनेरा, (कोंडेश्वर) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातील वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष तसेच
महिला विसावा कक्षाचे लोकार्पण कार्यक्रम
पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर यांच्यासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्षाचे लोकार्पण कार्यक्रम पोलिस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर यांच्यासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्षाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12 वाजता याच ठिकाणी करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, अमरावती यांच्याकडून मंजूर अनुदानातून पोलीस आयुक्त कार्यालयासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा