Amravati : अमरावती पोलीस आयुक्तालयाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी

ब्युरो टीम : अमरावती शहरात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 (1) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. 1 मेपर्यंत अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू राहील.

या आदेशानुसार, शस्त्रे, लाठ्या, तलवारी किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरली जाऊ शकतील अशा कोणत्याही वस्तू बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा ती फेकण्याची उपकरणे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन जाणे, व्यक्तींच्या किंवा मृतदेहांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, गाणी गाणे किंवा वाद्य वाजवणे, असभ्य हावभाव करणे किंवा सभ्यता आणि नीतिमत्तेविरुद्ध तसेच राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतील अशा चित्र, चिन्हे, फलक किंवा इतर वस्तू तयार करणे, प्रदर्शित करणे किंवा प्रसारित करणे, यासाठी मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने