bhagwat geeta class :गीता परिवराच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बाल संस्कार वर्गाचे आयोजन

 

ब्युरो टीम :श्रीराम मंदिर अयोध्या चे कोषाध्यक्ष गुरुगोविंद गिरी महाराज यांच्या प्रेरणेने 40 वर्षांपूर्वी संगमनेर मध्ये गीता परिवाराची स्थापना झाली. त्यानंतर डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात   व देशाबाहेर ही गीता परिवाराचे कार्य चालू आहे. या अंतर्गत भारतीय संस्कृतीचे मूल्य हे जर लहान मुलांमध्ये आली तर ते भारताचे भविष्य घडवू शकतात या विचाराने लहान मुलांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन, ऑनलाईन भगवद् गीता असे बरेच उपक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा बालसंस्कार वर्गाला प्रतिसाद पाहून यावर्षी आठ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे ,विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून जवळ असणाऱ्या केंद्रावर सहभाग नोंदवता येईल त्यामुळे  विद्यार्थ्यांचा वेळ व खर्चही वाचणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे मर्यादित जागा शिल्लक आहेत ,पालकांनी आपल्या मुलांना वर्गात प्रवेश घेऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गीता परिवार अहिल्यानगर दक्षिण च्या जिल्हाध्यक्ष  सुनंदा रविंद्र सोमाणी ,उपाध्यक्ष प्रतिभा बजाज, सेक्रेटरी सोमनाथ नजान ,कोषाध्यक्ष अलका नावंदर व सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.

बाल संस्कार वर्ग

कालावधी : 06 मे 2025  ते 15 मे 2025 

वेळ : सकाळी 09 ते 11

वयोमर्यादा : 09 ते 15 वर्षे (4 थी ते 9 वी)

केंद्र--(आपल्या जवळच्या केंद्रावर प्रवेश घेऊ शकता)

  •  इचरज बाई फिरोदिया प्रशाळा, नवी पेठ
  •  रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल, भवानीनगर
  •  मुरलीधर सारडा विद्यार्थी भवन ,तारकपुर बस स्टँडच्या  मागे,
  •  आनंद विद्यालय गुलमोहर रोड ,सावेडी,
  •  ऐश्वर्या हॉल, श्रीराम चौक 
  • लक्ष्मीनारायण मंदिर, कायनेटिक चौक
  • विठ्ठल मंदिर ,शेंगा गल्ली 
  • विनायक नगर (लेडीज हाॅल)

अशा एकूण आठ केंद्रावर एकाच वेळी हे संस्कार वर्ग चालवले जाणार आहेत.

आनंद विद्यालय गुलमोहर रोड येथे संध्याकाळी पाच ते सात या वेळेत लहान मुलांसाठी (पहिली ते तिसरी) एक केंद्र चालवले जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने