Education : सरस्वती विद्यामंदिर केडगाव येथे वर्ग खोल्या उद्घाटन सोहळा


ब्युरो टीम : अहिल्यानगर येथील प.पू. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्या मंदिर केडगाव येथे तीन वर्ग खोल्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला. याप्रसंगी विद्या भारती राष्ट्रीय शिक्षा संस्थानच्या राष्ट्रीय मंत्री डॉ. मधुश्री सावजी, विद्या प्रतिष्ठान नगर केंद्राचे अध्यक्ष दादा रामजी ढवान, संस्थेचे कार्यवाह प्राध्यापक सोमनाथ दिघे, सहकार्यवाह डॉ.रवींद्र चोभे, माजी प्राचार्य रामचंद्र पवार आदी उपस्थित होते. 

पहा व्हिडीओ :छत्रपती शिवरायांचे विचार सरकार विसरले,वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून खा. नीलेश लंके यांचा हल्लाबोल

विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत यांनी त्यांचे वडील कै. शांताराम कुमावत यांच्या स्मरणार्थ, विभाग प्रमुख डॉ. शर्मिला पारधे यांनी त्यांच्या मातोश्री कै. शकुंतला पारधे व सासूबाई  कै.शांता देशमुख या स्मरणार्थ तर ज्येष्ठ प्राध्यापक डॉ अविनाश भांडारकर यांनी त्यांच्या मातोश्री सौ. लिलाबाई भांडारकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त शाळेला प्रत्येकी एक वर्ग खोली देणगी स्वरूपात बांधून दिली.या वर्ग खोल्यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ मधुश्री सावजी यांनी डॉ. कुमावत, डॉ.पारधे, डॉ.भांडारकर यांच्या दातृत्व भावनेचे कौतुक केले. वर्ग खोल्यांचे बांधकाम करणारे नानासाहेब कुमावत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देशमुख साहेब, महाविद्यालयाचे डॉ. गोकुळदास  लोखंडे, प्रा.विशाल जाधव, प्रा. विलास पांढरे, डॉ.प्रदीप शेळके, प्रा. रूपाली ओक, प्रा. अनिता लवांडे, प्रा. सुनील वाकचौरे, दादासाहेब काजळे,  मनीषा वर्पे, प्रमोद राणा, सतीश लवांडे, जयंत मुळे, दीपक आढाव, तेजस रोकडे, दर्शन राहींज ,सरस्वती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने