ब्युरो टीम : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद २०२५ निवडणुकीत मतदान करण्यासाठी १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे. *मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगण्यास मनाई असल्याने कोणीही मतदान केंद्रामध्ये माबाईल बाळगू नये, असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पहा व्हिडीओ : अहिल्यानगर येथील कापडबाजारात नेमकं काय घडलं? आमदार संग्राम जगताप म्हणतात...
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी ४१ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी ९ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत वैद्यकशास्त्रातील वैद्यकीय व्यावसायिक हे मतदार असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकूण २ हजार ६२५ मतदारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. येत्या ३ एप्रिल २०२५ रोजी गुलमोहर रोड सावेडी येथील आनंद विद्यालयात सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत निश्चित केलेल्या ४ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
पहा व्हिडीओ : जेव्हा जगातील सर्वात उंच चिनाब पुलावरून धावते वंदे भारत रेल्वे..!
मतदानाच्यावेळी मतदारांची ओळख पटविण्यासाठी निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेने दिलेले नोंदणी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र, आधार कार्ड, बँक/पोस्ट कार्यालयाने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र किंवा राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र आणि निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची मूळ प्रत मतदानावेळी जवळ बाळगावी, असेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा