ब्युरो टीम : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक ३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येत होती. तथापि, आज ३ एप्रिल २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत मतदान प्रक्रीया स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रीया तात्काळ थांबविण्यात येत असल्याचे अहिल्यानगर उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.
मतदान प्रक्रीया तात्काळ स्थगित ठेवावी आणि आतापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सादर करावी. त्याचप्रमाणे मतपेट्या व मतदान प्रक्रीयेशी संबंधित लिफाफे संबंधित जिल्हा कोषागारात ठेवण्यात यावेत, अशा सूचना अवर सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-२०२५ यांनी दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा