Kolhapur :"डे विथ कलेक्टर"उपक्रमात हर्षला जयसिंग पडवळ या विद्यार्थीने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे

ब्युरो टीम: श्री रामेश्वर हायस्कूल मणदूर, ता. गगनबावडा येथील शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी हर्षला जयसिंग पडवळ या विद्यार्थीने ‘डे विथ कलेक्टर’ उपक्रमांतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले. आज दिवसभरात झालेल्या बैठकीत हर्षला पडवळ हिने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतली.

हर्षला जयसिंग पडवळ हिने सांगितले की, "मलाही शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठी काम करायचे असून यासाठी माझी आयएएस होण्याची इच्छा आहे. आज मला 'डे विथ कलेक्टर' या उपक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कामकाज अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. या उपक्रमातून मला प्रशासकीय कामकाजाबाबत खूप शिकायला मिळाले. शासनाविषयी माहिती मिळाली आणि प्रशासकीय कामकाज कसे चालते, त्याचबरोबर एखादा विषय कसा हाताळावा हेही आज मला कळाले. मला खूप आनंद वाटला. या उपक्रमातून शिकण्याची जिद्द अधिक वाढेल.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी. तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि ‘जिल्हाधिकारी’ यांच्या करिअर व कार्याची माहिती घेवून यातून त्यांना प्रेरणा मिळावी. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  "डे विथ कलेक्टर" हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. उत्सुक, प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने