विक्रम बनकर, अहिल्यानगर : देशात सध्या वक्फ बोर्ड विधेयकावरुन घमासान सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. आता या टीकेचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारण उमटत आहेत.
वाचा : पन्हाळ्यावरील शिवस्मारक कामाचा सुधारित आराखडा येत्या आठ दिवसांत सादर करा
श्रीगोंदा येथील भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांना वक्फविषयी इतका पुळका का? असा सवाल आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी उपस्थित केलाय. 'शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देणं प्रत्येकाने टाळलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्याला कुठलाही आधार नसतो,' असंही ते म्हणाले.
पहा व्हिडीओ : पुण्यात जोरदार पाऊस
'विधेयक नीट वाचले तर त्यात असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही. विधेयक संमत झाल्यानंतर वक्फ बोर्डाला कुठल्याही जागेवर हक्क सांगता येणार नाही. मला नवल वाटते की कधीकाळी हिंदू राष्ट्र आणि हिंदूंविषयी बोलणारे संजय राऊत यांना आज पुळका का आला? त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची आमची पात्रता नाही,' असा टोलाही पाचपुते यांनी लगावला.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा