ब्युरो टीम : नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी माहिती अधिकार अधिनियम 2005 कार्यशाळेचे आयोजन 8 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले. या शिबिरात अमरावतीचे अॅड. राजेंद्र पांडे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005, कायद्याची अंमलबजावणी, यातील 31 कलमे, प्रशासकीय कामकाजादरम्यान मागविलेल्या माहिती अधिकारात संबंधित करावयाची कार्यवाही, जन माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी, माहिती आयोगाचे अधिकार व कार्य अपील व शास्ती विविध माहितींचे अधिकार संबंधित आलेले शासन निर्णय आदी बाबत मार्गदर्शन केले.
क्रीडा व युवक विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा कार्यालयातील अधिकारी व आस्थापना कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माया दुबळे क्रीडा अधिकारी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा