Nashik : परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज सादर करा

ब्युरो टीम : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत प्रती वर्षी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुला-मुलींना) परदेशात पुदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी)  अध्ययनासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रक्रिया सुरू झाली असून पात्र विद्यार्थ्यांनी  परिपूर्ण अर्ज इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला,एम.एच. बी. कॉलनी, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स, समता नगर, येरवडा, पुणे -411006 या कार्यालयात समक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरून किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेस्थळावरील ताज्या घडामोडी या दुव्यावरून डाऊनलोड करून घ्यावेत. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी)  साठी अद्ययावत (Qx world universigy Ranking)200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेण्याऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते.

पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता,आकस्मिक खर्च याचा लाभ या योजनेंतर्गत मिळतो. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. याबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने